Coming from a family of music, the tunes and melodies have always played a greater role in my life. Working with a number of singers over the years, and composing countless albums for them has given me enough knowledge of singing and with these workshops, I am glad to share with you all.
Listening to melodies gets us to unknowingly hum to them.
With over 30+ years as a music director, Kedar Pandit has spent most of his time in the recording studios, working with dignitaries of the music industry. With his specially curated music workshops, take the first step to learn music the right way!
Students will also get special guidance on the various opportunities to be professional singers.
A brilliant opportunity for those who are looking to make a career in singing.
If You want to conduct A Workshop at your place then you can Email us on info@kedarpandit.in
Our Team will contact You.
केदार पंडित दादांचा वर्कशॉप म्हणजे माझ्यासाठी एक Life Changing Opportunity होती.
मी आजपर्यंत खूप संगीताचे वर्कशॉप attend केले होते. पण इतका systematically planned आणि संगीताच्या – गायनाच्या प्रत्येक बाजू cover करणारा हा एकमेव वर्कशॉप होता.
सुगम संगीतासाठी लागणारा रियाज त्यातील बारकावे, त्यासाठी लागणारे ताल, सुगम संगीतासाठी वापरले जाणारे राग…. इतकच नाही तर गायनासाठी किंवा एखाद्या कलाकारासाठी लागणारा योगासन- प्राणायामाचा अभ्यास आणि specially गायकांसाठी लागणार diet या सगळ्याची प्रात्यक्षिकं दादांनी आमच्याकडून करवून घेतली आणि मोलाची माहिती दिली.
गाण्याबरोबरच माइक टेक्निक, त्याच्यामध्ये स्टुडिओच्या आत कसं गावं, काय काय घडत असतं, आपला साऊंड कसा चेक करावा… ह्या सगळ्या गोष्टी पण दादांनी अतिशय उत्तम पद्धतीने explain केल्या.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संगीताच्या क्षेत्रातील विविध opportunities किंवा करता येणारी Careers याबद्दल पण दादांनी आम्हाला अगदी योग्य मार्गदर्शन केले.
संगीत क्षेत्राबरोबरच, आपण स्वतः एक व्यक्ती म्हणून कसं असावं, कसं वागावं ह्याचं पण मोलाचं मार्गदर्शन दादांकडून वेळोवेळी मिळत असतं.
In All…. केदार दादांचा वर्कशॉप म्हणजे एक खरोखरीच परिपूर्ण असा संगीताचा वर्कशॉप आहे.
केवळ त्यांच्या मार्गदर्शनामुळेच, मला स्वतःच्या नवनिर्मित गाण्यांची संकल्पना सुचली. गाणं जन्माला कसं येतं, त्याची संकल्पना काय असते, गाणं लिहिलं कसं जातं, त्याचं संगीत कसं घडतं? विविध वाद्यांचा उपयोग करून गाणं अस्तित्वात कस येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग कसं केलं जातं ह्या सगळ्याचा अगदीच खूप सुंदर असा अनुभव मला आला.
संगीताच्या क्षेत्रातील अतिशय अनुभव संपन्न असा हा सुंदर workshop घेतल्या बद्दल मी दादांचे खरोखरच अगदी मनापासून आभार मानते🙏🏼🙏🏼🙏🏼
काही वर्षांपूर्वी हौशी गायकांसाठी ‘ ‘ केदार पंडित यांची सुगम संगीत कार्यशाळा अशी जाहिरात एका ओळखीच्या व्यक्तींनी मला पाठवली। होती. जाहिरात एका प्रसिद्ध संगीतकारांची असल्यामुळे आपल्याला त्यांच्या समोर खरच गाता येईल का हे मनात एक द्वंद्व चालू होते. परंतु हौशी गायकांसाठी शब्दाने मी पुढे आले आणि जॉईन झाले .
सगळेच अनोळखी होते परंतु ओळख करून देताना दादांनी सर्वांना चार ओळी गाऊन आपल्या इंट्रो द्यायला सांगितला. आम्ही काही हौशेनवशे असल्याचे दादांना कल्पना आली असेलच .आमच्या कार्यशाळेत काही चांगले गाणारे, विशारद सुद्धा होतेच.
प्रथमच दादांनी सांगितले की मी गाणे बसवून घेणार नाही तर गाणं कसं गायचे हे सांगणार आहे आणि खरोखरच खेळीमेळीच्या वातावरणात ही कार्यशाळा सुरू झाली. गाणं समजून घेताना आधी त्या कवी/कवियत्री यांचे त्यामागील भाव, विचार तसेच रचनेचा मूड ओळखून त्यातील शब्दोचारांकडे कसे लक्ष द्यायचे , नेमका श्वास कुठे आणि।कसा घ्यायचा ..कोणत्या अक्षरावर नेमका जोर हवा .. त्या रचनेतील कोणता शब्द हळू आवाजात म्हणायला पाहिजे इतके बारीकसारीक शिक्षण सुगम संगीतात किती महत्त्वाचे हे दादांनी पटवून दिले .तसेच गाणे आपल्या गळ्यातून नव्हे तर हृदयातून गायले समोरच्याच्या मनाला भिडते हे दादांनी पटवून दिले त्यांनी इतक्या बारीकसारीक टेक्निक शिकवल्या की तोपर्यंत असा दृष्टिकोन ठेवून कधी गाणे गायले जाते असा विचारच केला नव्हता.
आरोह /अवरोह पलटे यांचा सराव तितकाच महत्वाचा आहे ,त्यामुळे नक्कीच गायनात परिपक्वता येते ,तेही सराव दादा करून घेतात.
दादांच्या स्वभाव हसरा आणि बोलका असल्याने समोरच्याला ते अगदी कम्फर्टेबल करतात. आपल्यामध्ये एक समान धागा निर्माण करतात आणि कधीही न रागवता अगदी संयमाने ते सगळ्या गोष्टी समजून सांगतात की खूप मोठी गोष्ट आहे .त्यानंतर काही दिवसातच कार्यशाळा संपल्यानंतरच सुगम गायनाचे क्लासेस चालू केले त्यात रेग्युलर आम्ही क्लासमध्ये मीही विद्यार्थिनी म्हणून जॉईन झाले आणि सुगम गायन शिकण्याचा दृष्टिकोनच बदलला.
त्यांनी शिकवलेले प्रत्येक गाणे इतके मनावर ठसले आहे. त्यातल्या बारकाव्यांची आठवण ठेऊन आम्ही हौशी संगीत मंडळी आज कार्यक्रम करू शकतो .हा विश्वास दिला तो केवळ दादांनीच… त्यांचे मनःपूर्वक आभार 🙏🏻
नमस्कार,
संगीत विषयक एका व्हॉट्सअप ग्रूप वर कोणीतरी मेसेज forward केलेला:- गाणे गा रे गा..!!– ‘गाण्याची आवड असणे…ते…गाणे “गाता” येणे…हा ‘प्रवास सोपा करणारी’ प्रख्यात संगीतकार श्री. केदार पंडित यांची सुगम संगीत कार्यशाळा”….
मेसेज मधल्या…”प्रवास सोपा करणारी.!!”..ह्या शब्दांकडे जरा लक्ष वेधले गेले आणि मी कार्यशाळेला नाव नोंदवले.. आणि मग, तिथून पुढे खरोखरच माझ्या सुगम संगीत शिक्षणाचा एक अनोखा, सुरस प्रवास सुरू झाला.
कार्यशाळेचे २ दिवस म्हणजे तर निर्भेळ आनंदाने भरलेली..प्रसन्न..आश्वासक सांगीतिक पर्वणीच होती माझ्यासाठी. बहुतांशी सहभागी विद्यार्थी माझ्यासारखे हौशेनवशे छंद वर्गातील होते… तसेच काही सुपरिचित, हौशी व्यावसायिक गटातील ही होते… पण तरीही सर्वजण खूप मोकळेपणाने त्या वातावरणात समरसून गेलो होतो… आणि ह्याचं मुख्य कारण म्हणजे – सर्वांना एकत्र सोबत घेऊन.. एका समतल पातळीवर आणून.. एकसाथ पुढे घेऊन जाण्याचे श्री केदार दादांचे कौशल्य…हे होय!🙏🏻
(ह्याचा प्रत्यय पूर्वीही आलाच होता…२०१० साली, गिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या “अंतर्नाद” ह्या mega musical event च्या वेळी🙏🏻👍)
कार्यशाळेची सुरुवात काही अत्यंत मूलभूत पण महत्त्वाच्या मुद्द्यांपासून झाली. उदा. कोणतेही गाणे सर्वप्रथम स्वच्छ, ठळक अक्षरात स्वतः समोर लिहिलेले असावे (गीतकार/संगीतकार/मूळ गायक/गायिका कोण? अल्बम/ चित्रपट कोणता इ.इ. माहिती सह.)
त्यानंतर ते गाणं २..४ वेळा तरी नुसतं वाचावें… ते कसं ? अन् का..??.. इथपासून ते थेट संपूर्ण गाणं निभावायचं कसं..इथपर्यंत.!!
ह्या सर्व प्रक्रियेतील, एक एक टप्प्या वरील अनेकविध अवघड पैलू दादांनी अतिशय सरळ, सोप्या अन् रंजक पद्धतीने उलगडून दाखविले; सर्वांकडून प्रात्यक्षिके ही करून घेतली.
सुगम संगीत गाणे – म्हणजे केवळ पाठांतराचे गाणे नसावे… तर, ते सुगम “गायन” असावे..! हा विचार त्यांनी खूप छान रीतीने उद्धृत केला. आणि ह्या “गायन” क्रियेत गाणाऱ्या कडून नेमके काय काय अपेक्षित असते या बद्दल देखील सखोल मार्गदर्शन केले.
उदा. गीत व संगीताची संरचना समजून घेणे (म्हणजेच गीतकाराची एखाद्या रचनेपाठी काय भूमिका आहे..आणि तिला अधोरेखित करण्यासाठी संगीतकारानी नेमकी काय योजना केलीय याची उमज येणे),
स्वतःच्या आवाजाची पट्टी व पल्ला (scale & range) ओळखून गाणे निवडणे अथवा त्यावर उचित मेहनत घेणे…ती वाढवणे,
गाण्याच्या आशयाला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करणे…त्यासाठी स्वरांतराचा रियाझ, स्वराक्षरांचा रियाझ.. वेगवेगळे पलटे उलट सुलट म्हणणे, गाण्यातील स्वरमेळ, स्वरसंवाद लक्षात घेऊन शब्दोच्चारांवर लक्ष देणे, शब्दभंग / अर्थहानी होणार नाही ह्याचे अवधान ठेवून स्वतःच्या श्र्वासाच्या जागा ठरवता येणे, with or without MIC गातानाचे बेसिक टेक्निक लक्षात घेणे, तालाचे वेगवेगळे ठेके..त्यांचे झोळ लक्षात घेणे.. इ.इ. आणखी खूप खूप काही…!! 🙏🏻
थोडक्यात, कार्यशाळेच्या २ दिवसात केदार दादांनी त्यांच्या प्रदीर्घ, वैविध्यपूर्ण सांगीतिक कारकीर्द आणि अनुभवांचा अमुल्य खजिना आम्हा विद्यार्थ्यांसाठी दिलदारपणें खुला केला होता. सुगम गायनासाठी आवाजाची तयारी काय अन् कशी करावी ह्याबद्दल दादांनी अनेक बारकाव्यांसह छोट्या छोट्या उदाहरणातून विशेष मार्गदर्शन आणि खास टीपा पुरवल्या. ह्या भरभरून मिळालेल्या शिदोरी मुळे सुगम-संगीत गायना विषयीचा माझा दृष्टिकोन पार बदलून गेला.
सुगम संगीत प्रकारावर पूर्वी कधीच मी सजगपणे लक्ष पुरवलेले न्हवते…काहीशी reluctant होते..(!??) पण, कार्यशाळेत गेले अन् मात्र…जादूची कांडी फिरल्यागत डोक्यात घर करून बसलेले वैचारिक जोखड एक एक करून निखळून पडू लागले.. धीर वाढला.. शिकविलेल्या सर्व गोष्टींचा जर मनःपूर्वक अंगीकार केला आणि सातत्य जर राखले… तर मला सुद्धा नक्की चांगले गाता येईल असा विश्वास वाटू लागला. आणि याचे संपूर्ण श्रेय केवळ केदार दादांना जाते. कार्यशाळे नंतर पुढे क्लास मधूनही त्यांचे मौलिक मार्गदर्शन लाभत आहे; ज्यामुळे माझा सांगीतिक विचार अधिकाधिक समृद्ध होऊ लागल्याचे मला व माझ्या निकटवर्तीयांना देखील जाणवू लागले आहे. परिणामी, सुगम गायनात रुची वाढू लागलीय. ही सर्व परम गुरुकृपाच म्हणावी लागेल. श्री सद्गुरू चरणी माझा विनम्र प्रणाम🙏
श्री केदार दादांना विनम्र अभिवादन व धन्यवाद!🙏 तसेच, त्यांच्या आगामी सर्व उपक्रमांसाठी मनःपूर्वक अनंत शुभेच्छा!! 💐💐
नमस्कार दादा,
मी आपले सुगम संगीताचे शिबीर केलेले. हे शिबीर खूपच छान झाले होते, आणि जिथे मला खूप काही शिकायची संधी मिळाली. गाणं कसं असावं आणि कसं असू नये हे सगळे तुम्ही छान शिकवले. गाणं शिकताना शास्त्रीय संगीताचा अभ्यास महत्वाचा आहे तसाच सुगम अंगाचा अभ्यासही महत्वाचा आहे हे तुम्ही आम्हा सर्व विद्यार्थ्यांना खूप सोप्प्या पद्धतीने शिकवले. व्यासपीठावर आणि रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये कसे गावे हे छान शिकवले. मला वयक्तिक माझे गाणे सुधारण्यास ह्या शिबिराचा खूप उपयोग झाला. सुगम संगीताचे असे शिक्षण आज पर्यंत कोणाकडूनही मिळालेले नाही.
Subscribe for Latest Updates about Albums, Workshops